नांदेड: अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध मरखेल पोलिसांनी केली कार्यवाही, 81,880 चा मुद्देमाल केले जप्त
ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत पोलीस स्टेशन मरखेल यांनी अवैधदेशी दारू विक्री करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकत्रितपणे 81 हजार 880 रुपये चा मुद्देमाल जप्त केले आहेत, या कारवाई मध्ये जे आरोपी अवैधरित्या देशी दारू विक्री करत होते त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील नोंद करण्यात आला असून आरोपीची नावे बालाजी शिंदे व दिनेश राठोड असल्याची माहिती आजरोजी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास विशेष प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.