अमळनेर शहरातील ख्वाजा नगरात बोरींगमधील पाणी नळीने मारत असतांना पाण्याचे शिंतोडे अंगावर पडल्याने एका महिलेसह तिच्या कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकून दुखापत केल्याची घटना शुक्रवारी २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.