आरोग्य विभाग,जिल्हा परिषद जळगाव.
**कजगाव येथे सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह साजरा**
कजगाव-जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यात सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह साजरा केला जात आहे.
भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.समाधान वाघ व प्राथमिक आरोग्य केंद्र कजगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका पाटील यांच्या सूचनेनुसार कजगाव येथील ब.ज.हिरण माध्यमिक शाळेत सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात आली.डॉ.श्रीकांत मराठे यांनी सिकलसेल आजाराविषयी संपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले मार्गदर्शन केले.कार्यक्रमप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय केदार,उपमुख्याध्यापक गोकुळ पाटील,शिक्षकवृंद तसेच आरोग्य पथकामध्ये आरोग्यसेवक रोहित महाले, आरोग्य सेविका उज्वला परदेशी महालॅबच्या वर्षा गढरी व कजगाव येथील सर्व आशास्वयंसेविका उपस्थित होत्या.