वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला निषेध
राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते मात्र हा पुतळा काल कोसळला असून यावर आता राजकारण चांगलाच तापल आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची जोड उठवली असून आज दुपारी २ वाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला आहे. यावेळी पुंडकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली असून भाजपवर देखील ताशेरे ओढले आहेत. तसेच या घटनेबाबत त्यांनी निषेधही व्यक्त केला.