नांदुरा: 'त्या' लाचखोर अधिकाऱ्यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
सोळा हजारांची लाख स्विकारतांना रंगेहात पकडलेल्या आरोपी पुरवठा निरीक्षण अधिकारी पुनम श्रीकृष्ण थोरात यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.नांदुऱ्याची पुरवठा निरीक्षण अधिकारी पुनम थोरात हिला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १६ हजार रुपयांची लाच घेतांना दिनाक १४ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले होते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपी पुनम थोरातला न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने तीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.