भंडारा: "भाजप आता 'व्यापारी, सुपारीबाज व माफियांचा पक्ष' झाला!" माजी नगरसेविकेचा गंभीर आरोपांसह राजीनामा; पत्र #Viral
भंडारा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका आणि भंडारा शहर भाजपच्या उपाध्यक्ष वनिता दिलीप कुथे यांनी पक्षाला मोठा धक्का देत आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी भाजपच्या सध्याच्या कार्यप्रणालीवर अत्यंत गंभीर आणि स्फोटक आरोप केले आहेत. 'गेल्या २० वर्षांपासून निष्ठेने काम करूनही माझा विश्वासघात करण्यात आला, कारण तिकीट थेट बाहेरून आलेल्या आणि राजकारणाचा गंध नसलेल्या महिलेला देण्यात आले,' अशी तीव्र वेदना त्यांनी व्यक्त केली आहे.