आज दिनांक 22 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवनी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. विजयाताई राजेश नंदुरकर, नगरसेवक श्री. यादोराव भोगे व नगरसेविका सौ. भाग्यश्री बहादुर गोमासे यांनी गोंदिया येथील रामनगर निवासस्थानी खासदार प्रफुल भाई पटेल यांची सदिच्छा भेट घेतली . यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे खासदार प्रफुल पटेल यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.