आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत गोंदिया मार्गावरील साई आशीर्वाद मोटर्स कंपनीत कंपनीच्या मोकळ्या आवारातून चोरट्यांनी ट्रॉली चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. १०) उघडकीस आली आहे.अरविंद सुनील चौधरी (३२, रा. कामठा) हे साई आशीर्वाद मोटर्स कंपनीत कार्यरत आहेत. कंपनीच्या गोंदिया रोडवरील आवारात लाल रंगाची ट्रॉली ही मोकळ्या जागेत उभी करण्यात आली होती. २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता ते २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी