विठोली येथे आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अर्चना पुरुषोत्तम इंगळे यांच्या शेतातील ऊसपिकाला अचानक आग लागली. शेत सर्वे नंबर १२/२ मधील सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून पूर्णतः जळून खाक झाला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत ऊस पूर्णपणे जळून नष्ट झाला. संबंधित विभागाने नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात