आर्वी तळेगाव मार्गावरील श्रीनाथ जिनिंग व प्रेसिंग कंपनीमध्ये 17 तारखेला रात्री तीन ते साडेपाचच्या दरम्यान चोरट्यांनी चोरी करून टेबलच्या ड्रावर मधील नगदी 12,10,270 रुपये लंपास केल्याच्या घटनेने खळबळ आली आहे.. यासंदर्भात मालक पंकज धनपतराव टावरी वय 48 वर्षे राहणार सत्यनारायण वार्ड आर्वी यांनी या घटनेची तळेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून तळेगाव पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती आज दिली आहे