करमाळा: कंदर येथे कोयता, चाकूने मारहाण करून केली चोरी, 5 अनोळखी इसमांवर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल
कंदर येथे ज्योती डोके यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कड़ी लोखंडी कटावणीच्या सहाय्याने उचकटुन अनोळखी इसमांनी बेडरुममध्ये प्रवेश करुन लोखंडी कपाट फोडले व त्या व मुलगी श्रध्दा हिला कोयता, चाकु कटावणीने डोक्यात हातावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांचे गळयातील मिनी गंठण जबरदस्तीने ओढुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसात अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.