शिरजगावकसबा सर्कलचे माजी जिल्हा परिषदसदस्य सुखदेवराव पवार यांनी मोर्शी वरूड अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्याला भेटी देऊन, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या अनुषंगाने आज दिनांक 11 डिसेंबरला दुपारी अडीच वाजताचे दरम्यान धामणगाव गढी येथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन धामणगाव गढी ते एकलासपूर रस्त्याला मातोश्री पानंदरस्त्याचा दर्जा देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी तहसीलदार अचलपूर यांचेकडे केली आहे