आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम शंभूटोला येथील रमेश लठारू शिवणकर (५५) या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) घडली. विषप्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी ५:३० वाजता भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू रात्री ११:२२ वाजता झाला. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी शनिवारी (दि. १०) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार कुंभरे करीत आहेत.