हिंगणघाट शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्लिपुर येथे काठीने जिवाने ठार मारणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावणी असुन ५० हजार रुपये रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावल्याची माहिती सरकारी वकील ॲड दिपक वैद्य यांनी प्रसिध्दी पत्रातून दिली आहे.प्राप्त माहितीनुसार २२ मे २०२२ रोजी आरोपी मारोती नागोराव क्षीरसागर यांनी मृत्यक सुधाकर कलोडे यांच्याशी वाद करून काठीने मारून जीव ठार केले.