कराड: कराडमधील चक्रव्यूह फोडून भाजप विजयी होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास
Karad, Satara | Nov 30, 2025 कराड आणि मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दत्त चौकात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर विरोधकांकडून होत असलेल्या राजकीय दबाव, वेढा आणि चक्रव्यूहाचा मुद्दा उपस्थित करत यावर जोरदार प्रतिक्रिया नोंदवली. फडणवीस म्हणाले, कराडमध्ये आमदार अतुलबाबा भोसले यांना चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे.