मेहकर: कार्तिक महोत्सवामध्ये देऊळगाव माळी कर झाले भक्तीरसात तल्लीन!देव सदैव तुमच्यासोबत–ह.भ.प.प्रणितीताई गवारे
श्री.पांडुरंग संस्थान व समस्त गावकऱ्यांच्या वतीने दे.माळी येथे आयोजित भव्य कार्तिक यात्रा महोत्सव आणि श्रीमद् भागवत सप्ताह सध्या भक्तीरसात न्हाऊन निघत आहे.२९ ऑक्टो रोजी सुरू झालेल्या या ज्ञानयज्ञाची सांगता ५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महाप्रसादाने होणार आहे. या सोहळ्यात संत-महंतांच्या मुखातून बरसणाऱ्या ज्ञानगंगेमुळे परिसरातील वातावरण 'वैकुंठ 'मय झाले आहे. सप्ताहाच्या कीर्तनमालेत,3 नोव्हें रोजी ह.भ.प. प्रणिती ताई गवारे गेवराई यांची कीर्तन सेवा संपन्न