दिनांक 7 जानेवारीच्या 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान हनुमान चौक धापेवाडा येथे मोटरसायकल क्रमांक एमएच 35 एडी 0716 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगाने निष्काळजीपणे लापरवाहीने चालवून रमेश पटले वय 49 वर्षे यास मागेहून धडक देऊन गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झाल्याने फिर्यादी उमेश पटले यांच्या तक्रारीवरून दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास दवनीवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.