भिवंडी: भिवंडी बायपास येथे वाहनचालकावर होते नियमबाह्य दंड वसुली, वाहन चालकाचा आरोप
Bhiwandi, Thane | Nov 19, 2025 भिवंडी बायपास रस्ता, खाडी पुलावर एक अनोळखी इसम मोबाईलवर वाहनांचे फोटो काढून वाहतूक शाखेला पाठवतो आणि त्यावरून वाहनचालकांवर दंड आकारला जातो, असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून वेगाने व्हायरल होत आहे. हा इसम स्वतःला ट्रॅफिक वॉर्डन असल्याचा दावा करतो. मात्र, त्याच्याकडून विचारणा केली असता अरेरावीचे वर्तन पाहायला मिळते. या प्रकाराला एका वाहनचालकाने थेट विरोध करत वाहतूक शाखेवर नियमबाह्य दंड वसुली करत असल्याचा आरोप केला आहे.