नांदुरा: निवडणूक अपडेट;नगराध्यक्ष पदासाठी 10 तर नगरसेवक पदाच्या 25 जागेसाठी 137 अर्ज
नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होत आहे यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर तर 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत तर नगरसेवक पदाच्या शहरातील एकूण बारा प्रभागातील 25 जागेसाठी 137 उमेदवारांचे अर्ज वैद ठरविण्यात आले.