बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणात आणखी तिन आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहगाव (झिल्पी) येथून शुभम गुणवंत धोटे, स्वप्नील गुणवंत धोटे आणि खंडाळझर (ता. भिवापूर) येथून नामदेव सीताराम मसराम या तिघांना ता. ९ डिसेंबरला रात्री ११.३० वाजता अटक करण्यात आली आहेत. पाचही आरोपींना सेलू न्यायालयात हजर केले असता पाचही आरोपींना १२ डिसेंबर पर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.