राहुरी नगरपालिका इमारतीच्या कार्यालयाच्या पायरीवर नतमस्तक होत नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी आज सोमवारी सकाळी अधिकृतरित्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. नगरपालिकेच्या पायरीला वंदन करून जनतेच्या सेवेला समर्पित होण्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी उपस्थित मान्यवर, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या नेतृत्वाचे स्वागत केले.