पुण्यातील गांजवे चौकात दोन मिनीबस आणि एका कारचा भीषण अपघात झाला. कारचालकाने अचानक रस्त्यात वाहन थांबवल्यामुळे मागून येणारी एक मिनीबस पुढील मिनीबसवर आदळली. या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसमधील प्रवासी आणि कारचालक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.