अकोला: अकोल्यात 43 अनोळखी मृतदेहांचे पराग गवई यांच्याकडून स्वखर्चाने मोहता मिल येथे केले अंत्यसंस्कार
Akola, Akola | Nov 29, 2025 अकोल्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आढळलेल्या 43 अनोळखी मृतदेहांचा आज वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांनी स्वखर्चाने अंत्यविधी केला. गेली दोन दशके पराग गवई आणि त्यांचा मित्रपरिवार अनोळखी मृतकांचे अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सातत्याने करत असून, आतापर्यंत 961 पेक्षा अधिक मृतदेहांना त्यांनी अंतिम सन्मान दिला आहे. द्रोपदाबाई, मंदाबाई, राजू, सुनील, रोहित यांच्यासह इतर मृतकांचा विधिवत अंत्यविधी करण्यात आला. या वेळी विविध सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी उपस्थित होते.