*अमरावतीतील पायाभूत प्रकल्पांना वेग — महापालिकेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर बैठक* *महत्त्वाच्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा • संबंधित विभागांना वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश* *अमरावती, २ डिसेंबर २०२५* अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील वाढती वाहतूक, नागरिकांची सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा मजबुतीकरण यांचा सखोल विचार करून विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आज महापालिकेत व्यापक आढावा बैठक घेण्यात आली.