कन्नड नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या रंजना रविंद्र राठोड यांची निवड झाल्याने कन्नड तालुक्यातील बंजारा समाजासाठी हा मानाचा क्षण ठरला आहे. संतोष कोल्हे यांनी बंजारा समाजावर असलेले विशेष प्रेम कृतीतून दाखवून देत समाजाला सन्मानाची संधी उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, अहेमदअली भैय्या, सुधाकर देवकर आणि संतोष कान्हे यांची नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.