दारव्हा: तळेगाव ते इरथळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची सामाजिक कार्यकर्ते विजय पाचकोर यांचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे मागणी
दारव्हा तालुक्यातील तळेगाव ते इरथळ हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त असून या रस्त्याने येजा करताना पादचऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विजय पाचकोर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंता यांना मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबरला दु. १ वाजता निवेदन देऊन रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली आहे