आज दिनांक 13 जानेवारी 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन नगर परिषद कार्यालयामध्ये नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुरेखाबाई बाळू देशमुख यांची सर्व सदस्य यांच्या वतीने निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मिर्झा समरीनाज यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली असून यावेळी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित झाले होते.