राघवेश्वर देवस्थान कुंभारीच्या विकासासाठी १.५० कोटींचा निधी मंजूर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री राघवेश्वर देवस्थान, सुशोभीकरण व विकासकामांसाठी राज्य शासनाने तब्बल १ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आज १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा.दिली आहे.या निर्णयामुळे परिसरातील श्रद्धाळू भाविकांना अधिक सुव्यवस्थित सुविधा उपलब्ध होणार आहेत.