पोलीस स्टेशन कुही अंतर्गत येत असलेल्या चांपा शिवारात दुचाकी चालकाने निष्काळजी पणे वाहन चालविण्याने दुचाकी उभ्या ट्रकवर आदळली. आणि चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना चांपा शिवारात घडली.विकी प्रभाकर लाखे वय 24 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. मृतक व त्याचे 2 मित्र जामसावळी येथून देवदर्शन करून गावाकडे परत येत असताना अपघात झाला. याप्रकरणी कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कुही पोलीस करीत आहेत.