लाखनी: मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलीस वाहनाला दुचाकीची धडक!
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकाच्या वाहनाचा, पालांदूर-गणसाई बारजवळ भीषण अपघात झाला. भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या ट्रिपल सीट मोटारसायकलमुळे हा अपघात घडला, ज्यात मोटारसायकल चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने शासकीय वाहनाला समोरून जोरदार धडक बसली. या घटनेत दुचाकीवर बसलेले एक इसम जखमी झाले असून, मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.