आज दिनांक 8 फेब्रुवारी 2020 वार रविवार रोजी सकाळी 10वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर पोलिसांनी बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा स्कार्पियो कार क्र.MH 21BF5206 या कारमध्ये एकूण 2लाख 49 हजार 360 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला असून यात संदीप दत्ता भुमकर, रमेश गावंडे रवी फूके यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून साडेबारा लाखाचा मुद्देमान जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी 7 फेब्रुवारी रात्री केली.