पुणे शहर: नवले पूलाजवळ कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडले
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नवलेपुलाजवळ कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या मुंबई ते बेंगलोर जनावरांना घेऊन जाणाऱ्या गाडीला सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. गाडीमध्ये 500 च्यावर जनावर भरून अमानुषपणे त्यांचे हाल करून कत्तलीसाठी बेंगलोर येथे घेऊन चालले असताना पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नवले पुलाच्या अलीकडे अडवून पकडले. गाडीमध्ये चालकासहित सहा लोक प्रवास करत असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. त्यांना जाब विचारताच त्यातील पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले पण सामाजिक कार्यकर्त्यांनी चालत आला पकडून सिंहगड रोड पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.