जिल्हा आरोग्य विभाग, गोंदिया आगामी 'सिकलसेल विशेष अभियानाच्या' पार्श्वभूमीवर आज नोडल ऑफिसर मा.डॉ.विजय डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.या बैठकीत अभियानाच्या यशस्वी नियोजनासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.अभियानाचा कालावधी आणि स्वरूप येत्या १५ जाने.ते ७ फेब्रु.२०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात 'सिकलसेल विशेष अभियान'राबवण्यात येणार आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश सिकलसेल आजाराची वेळीच निदान करणे आणि रुग्णांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे हा आहे.