देवळाली नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी विरोधकांना थेट आणि कठोर शब्दांत इशारा दिला आहे. “निवडणूक चार दिवसांची असते. निवडणूक संपली की मी राजकारण सोडतो. मात्र विरोधकांनी आमच्या शेपटावर पाय दिला, किंवा आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला बोट लावले, तर तंगड्या काढल्याशिवाय राहणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. गुरुवारी रात्री सोसायटी प्रश्नंगणात भाजपाची आभार सभा पार पडली. या सभेत बोलताना नगराध्यक्ष कदम यांनी विरोधकांवर निशाणा साधत आक्रमक भूमिका मांडली.