भंडारा: गिरोला येथे तब्बल ११ फूट लांबीचा 'धामण' साप पकडला; सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे धोका टळला!
भंडारा तालुक्यातील गिरोला येथील परमानंद कोटांगले यांच्या राहत्या घरी तब्बल ११ फूट लांबीचा धामण जातीचा साप घरात शिरल्याची माहिती आज दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी रेस्क्यू कॉलद्वारे सर्पमित्रांना मिळाली. माहिती मिळताच सर्पमित्र आशिष घुर्वे आणि सहकारी मित्र प्रमोद मोहतुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. धोकादायक परिस्थितीतही अत्यंत कौशल्याने व सुरक्षितपणे त्यांनी त्या अजस्त्र सापाला पकडले. घरात इतक्या मोठ्या सापाच्या शिरकावामुळे कुटुंब भयभीत झाले होते, परंतु सर्पमित