आज दि 5 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता पैठण तालुक्यातील नांदर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठवाड्यात इतिहासात कधी नव्हे एवढी आपत्ती ओढवली असून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकार फक्त अभ्यास करत असल्याचा आरोप करून ठाकरे म्हणाले की, “शेतकरी जमिनीतून कोंब फोडू शकतो, तर सरकारलाही फोडू शकतो.” दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन देऊन सरकार आळस करत असल्याचे सांगत, त्यांनी तात्काळ