पाटेकुर्रा व रामपुरी येथे मराठी नाटकाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे.यामुळे जागरूकता वाढते आणि समाज सशक्त होतो.नाटकातून मिळणारा संदेश लोकांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवतो. ज्यामुळे समाजाला योग्य दिशेने मार्गदर्शन मिळते असे याप्रसंगी लायकराम भेंडारकर म्हणाले. विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर,लोकप्रतिनिधी,समाजसेवक,आयोजक आणि नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.