हिंगोली दिनांक 30. सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मसोड येथे "स्वस्थ नारी सशक्त परिवार "अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये कळमनुरी येथील खासगी वैद्यकीय व्यावसायिक श्रीमती डॉ.मस्के स्त्रीरोग तज्ञ यांच्यामार्फत गरोदर माताची तपासणी करून आहाराविषयी समुपदेशन करण्यात आले, त्याचबरोबर किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करून समुपदेशन करण्यात आले यशिबिरात एकूण 195 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मसोड येथील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर उपस्थीत होत्या