चंदावरकर नाल्याच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत पडली, मनपा अधिकारी व आमदार चौधरी यांनी केली पाहणी
दहिसर विधानसभा मतदार संघात वार्ड क्र. 10 येथील एक्सर गावातून जाणार्या चंदावरकर नाल्याच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत पडल्याची बातमी कळताच घटनास्थळी धाव घेऊन झालेल्या दुर्घटनेची मुंबई मनपा अधिकाऱ्यांसोबत आमदार मनीषा चौधरी यांनी आज दुपारी १ वाजता पाहणी केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी संरक्षण भिंत पडल्यामुळे काही घरांच्या भिंतीचा भाग कोसळला आहे. यावेळी उपस्थित स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांना धीर देण्याचे काम केले तसेच मनपा अधिकार्यांना योग्य त्या सुचना दिल्या.