इंदापूर: मंगळवारी आप्पासाहेब जगदाळे ,भरत शहा यांच्यासह अनेकांचा होणार शरद पवार गटात पक्ष प्रवेश - तालुकाध्यक्ष अँड. तेजसिंह पाटील
Indapur, Pune | Apr 15, 2024 पुणे जिल्हा बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे हे तसेच इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष भरत शहा व निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात मंगळवारी दि.१६ एप्रिल रोजी प्रवेश होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी दिली.