भोर: नसरापूरजळील देगाव फाटा परिसरात जेसीबी-रिक्षाचा भीषण अपघात; सहा जण जखमी
Bhor, Pune | Aug 26, 2025 दुपारी सुमारे तीनच्या सुमारास साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर देगाव फाटा समोर एक मोठा अपघात झाला. विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या जेसीबीच्या मागच्या बकेटने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोराची धडक दिल्याने सहा प्रवासी जखमी झाले आहेत.