https://youtu.be/mBxoUFGTDzM?si=Szj_txRaDgVqijH5 दिग्रस शहरातील शनी मंदिराजवळील धांवडा नदीच्या पुलावरून मुलगी नदीत पडल्याची अफवा सायंकाळी वाऱ्यासारखी पसरली. या अफवेमुळे पुल परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. मात्र चौकशीनंतर ही घटना केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. एका लहान मुलाने चुकीची माहिती दिल्यामुळे काही काळ शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.