उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली यांना गुरुवार दि18 डिसेंबरला रात्री10 वाजता चुलबंद नदी पात्रातून मर्हेगाव येथे ट्रॅक्टरने रेती चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे घटनास्थळी धाड टाकली असता या ठिकाणी तीन ट्रॅक्टरसह पाच जण विनापरवाना अवैधरित्या रेती चोरी करताना आढळून आले त्यांच्याकडून तीन ट्रॅक्टर,तीन ट्रॉली तीन ब्रास रेती व इतर साहित्य असा एकूण 18 लाख12 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी साकोलीचे शिवम विसापूरे यांनी ही कारवाई केली