साकोली पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोपाबोडी येथे पट्टेदार वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना रविवार दिनांक 18 जानेवारीला पहाटे सहा वाजता झाले हा वाघ दोन पिल्लांसह शेतकऱ्यांना दिसला आहे शेतकऱ्यांनी दूरून त्याचा फोटो देखील घेण्याची हिंमत केली आहे. वाघांची संख्या व बिबट्यांची संख्या वाढल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांना शेतात जाताना धडकी भरत आहे