बिबट्याची दहशत वाढताना दिसून येत आहे. आज दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास बदलापूर येथील आंबेशिवमध्ये पुन्हा एकदा बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आहे. बिबट्याने केलेल्या शिकारीमुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे. या संदर्भात प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली आहे.