भोर: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील माझेरीत भात काढणीसाठी गावी निघालेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील माझेरी (ता. महाड, जि. रायगड) हद्दीतील एका वळणाजवळील साइडपट्टीवरून दुचाकी दरीच्या बाजूला कोसळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.ही घटना बुधवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास घडली.शिवाजी दाजी डेरे (वय अंदाजे ५०, रा. शिळिंब, ता. भोर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.