लाखनी: सावरी मुरमाडी येथील शेतातून १६ हजारांचे लोखंड चोरीला!
तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथील रहिवासी रामकृष्ण सोर्विदा वंजारी (वय ६७) यांच्या सावरी शेतशिवारातुन अज्ञात चोरट्याने सुमारे १६ हजार रुपयांचे बांधकाम साहित्य लंपास केले आहे. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्याने शेतात ठेवलेले १० मि.मी.चे दोन बंडल, ८ मि.मी.चे एक बंडल आणि ५ मि.मी.चे एक बंडल असे एकूण १६ हजार रुपयांचे लोखंडी सळया (लोहा बार) चोरून नेल्या.