पाण्याच्या शोधात शहरी भागात आलेल्या एका हरणाला जालना शहरातील नागरिकांनी तत्परता दाखवत सुरक्षितरित्या वाचवले असून संबंधित हरणाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मंगळवार, दि. 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या मानवीय कृतीमुळे हरणाचा जीव वाचला असून परिसरात नागरिकांच्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे. जालना शहरातील नॅशनल नगर परिसरात हे हरण पाण्याच्या शोधात भटकत आले होते. शहरी वस्तीमध्ये अचानक हरण दिसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.