राधानगरी: तालुका कृषी अधिकारी, लक्ष्मीनारायण नैसर्गिक सेंद्रिय शेती व आत्मा यांच्या विद्यमाने गुडाळ येथे सेंद्रिय शेती मेळावा
राधानगरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, लक्ष्मीनारायण नैसर्गिक सेंद्रिय शेती उत्पादन गट आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने गुडाळ येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण मेळावा पार पडला. १३ मार्च रोजी दुपारी दीड वाजता हा मेळावा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी लक्ष्मीनारायण समूहाचे अध्यक्ष शिवाजी पाटील होते. कनेरी मठाचे कृषी अधिकारी तानाजी निकम यांनी जमीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आवश्यकता असल्याचे सांगितले.