नगरपरिषद रामटेक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या पाच नगरसेवकांचा सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचे कार्यालय नागपूर येथे शनिवार दिनांक 27 डिसेंबरला करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, रामटेकचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंग उर्फ गजू यादव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले प्रामुख्याने उपस्थित होते. कविता मुलमुले, आलोक मानकर, प्रभाकर खेडकर,लक्ष्मी अहिरकर, रजत गजभिये यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.